Ad will apear here
Next
‘सीए सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रतिनिधी’
प्राप्तिकरांतील तरतुदींवर कार्यशाळेत प्रमोदकुमार गुप्ता यांचे प्रतिपादन


पुणे : ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.

दी इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘सेवाभावी आणि धार्मिक संस्थांसाठीच्या प्राप्तिकरातील तरतुदी’ या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’ भवनात झालेल्या कार्यशाळेत पुण्यातील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. एस. मीना, अतिरिक्त आयुक्त संदीप साळुंखे, अभिषेक मेश्राम, नरेंद्र काणे, सीए शशांक पत्की, ‘आयसीएआय’च्या उपाध्यक्षा सीए ऋता चितळे, जगदीश धोंडगे, अभिषेक धामणे उपस्थित होते. सुमारे २०० सीए या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

गुप्ता म्हणाले, ‘करदाते, सीए आणि कर विभागातील अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून चांगले वातावरण ठेवले पाहिजे. सेवाभावी संस्थांनी कर भरताना तरतुदी अभ्यासाव्यात व त्यानुसार आपल्या खर्चाचा ताळेबंद करावा. त्यासाठी सीए मंडळींनी मार्गदर्शन करावे.’

शशांक पत्की, एस. एस. मीना यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZTSBV
Similar Posts
‘लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध’ पुणे : ‘सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांत काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,’ असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दी इन्स्टिट्यूट
‘सीए फाउंडेशन डे’निमित्त २८ जूनला विविध कार्यक्रम पुणे : सनदी लेखापाल स्थापना दिवसानिमित्त (सीए फाउंडेशन डे) दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जून २०१९ रोजी बिबवेवाडीतील ‘आयसीएआय’ भवन येथे गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम होणार आहे
‘लेखापालांनी कौशल्य व नवतंत्र आत्मसात करावे’ पुणे : ‘काळाप्रमाणे सनदी लेखापालांनी (सीए) विकसित ज्ञान, कौशल्य आणि नवतंत्र आत्मसात करायला हवे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमतेमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत. २०३० पर्यंत बरीच क्षेत्रे स्वयंचलित होतील. त्यात आपले अस्तित्व कायम राहण्यासाठी नीतिमूल्ये, नवीन तंत्रज्ञान, माहिती, सुरक्षितता जपायला हवी.
‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहर पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०१८ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दोन, तर विभागीय पातळीवर दोन असे चार पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर ‘आयसीएआय पुणे’ला दुसरी सर्वोत्तम शाखा आणि सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language